टेक्सासमध्ये अपघातानंतर SUV ला भीषण आग, 4 हिंदुस्थानींचा होरपळून मृत्यू

टेक्सासमध्ये अपघातानंतर SUV ला भीषण आग, 4 हिंदुस्थानींचा होरपळून मृत्यू

अनेक वाहने एकमेकांवर आदळल्यानंतर SUV ला भीषण आग लागून कारमधील 4 हिंदुस्थानींचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका तरुणीचा समावेश आहे. चार हिंदुस्थानींपैकी तिघे तरुण तेलंगणातील तर तरूणी तामिळनाडूतील रहिवासी आहे. आर्यन रघुनाथ ओरमपती, फारुख शेख, लोकेश पालाचारला आणि दर्शिनी वासुदेवन अशी अपघातात मृत्यू झालेल्या चौघा हिंदुस्थानींची नावे आहेत. चौघेही यूएसमधील बेंटोनविले प्रवासासाठी कारपूलिंग अ‍ॅपद्वारे कनेक्ट झाले होते.

भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला. अनियंत्रित ट्रकने एसयूव्हीसह पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर एसयूव्हीने पेट घेतला. यावेळी कारमधील चौघेही गाडीत अडकल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. आगीत होरपळल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहेत. यासाठी डीएनए चाचणी करण्यात येत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्यन डॅलस येथे त्याच्या चुलत भावाला भेटून बेंटोनविले येथील घरी परतत होता. लोकेश आपल्या पत्नीला भेटण्यासाठी बेंटोनविलेला जात होता आणि दर्शिनी तिच्या काकांना भेटण्यासाठी जात होती. दर्शिनीच्या पालकांनी हिंदुस्थानचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याकडून मदतीचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;