उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्धविहाराचे लोकार्पण
उदगीर येथे निर्माण करण्यात आलेल्या विश्वशांती बुद्धविहाराचे बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बौद्ध भिक्खूंच्या वतीने राष्ट्रपतींना गौतम बुद्धाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
उदगीर येथील तळवेस परिसरात विश्वशांती बुद्धविहाराची निर्मिती करण्यात आली आहे. हा बुद्धविहार कर्नाटकातील कलबुर्गी येथील बुद्धविहाराची प्रतिकृती आहे. जवळपास तीन एकर जागेवर हा विहार उभारण्यात आला असून यात १२०० अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे. विहाराचे प्रवेशद्वार सांचीच्या स्तूपाप्रमाणे बनवण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फीत कापून बुद्धविहाराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी विहारातील गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींची उपस्थिती होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List