सुशांत सिंह राजपूतच्या एक्स-गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, ‘पुरुषांवर कधीच दबाव…’

सुशांत सिंह राजपूतच्या एक्स-गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, ‘पुरुषांवर कधीच दबाव…’

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्याच्या निधनानंतर रिया हिला तुरुंगाची देखील हवा खावी लागली होती. अनेत संकटांचा सामना केल्यानंतर रिया हिने पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर रियाच्या नावाची चर्चा उद्योगपती निखिल कामत याच्यासोबत होत आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रियाला लग्नाबद्दल देखील विचारण्यात आलं. यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. रिया म्हणाली, ‘लग्नासाठी ठराविक वयाची काहीही गरज नसते. माझ्या काही मैत्रिणी आहेत, ज्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी लग्न केलं आहे आणि आता मुलांचा सांभाळ करत आहेत.’

पुढे रिया म्हणाली, ‘कायम पाहिलं गेलं तर, पुरुषांवर कधीच लग्नासाठी दबाव टाकला जात नाही. कायम महिलांवर लग्नासाठी दबाव असतो. असं का असा प्रश्न मला नेहमी पडतो? बायोलॉजिकल क्लॉकमुळे असं असावं असं मला वाटतं…’ असं देखील रिया म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

 

एवढंच नाही तर, रियाने लग्नासाठी स्पष्ट नकार देखील दिला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नासाठी मी बिलकूल तयार नाही. मला माझ्या आयुष्यात खूप काही करायचं आहे. त्यामुळे पुन्हा मला कोर्टाच्या कचाट्यात अडकायचं नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

रिया चक्रवर्ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री 1 महिना तुरुंगात होती. शिवाय अभिनेत्रीचा भाऊ देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण आता अभिनेत्री नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्री ‘चॅप्टर 2’ नावाने नव्या पॉडकास्टची सुरुवात केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

 

रिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;