जान्हवी किल्लेकर हिने काढली थेट छोट्या पुढारीची अक्कल, लोकांमध्ये संताप, शिव्या आणि…

जान्हवी किल्लेकर हिने काढली थेट छोट्या पुढारीची अक्कल, लोकांमध्ये संताप, शिव्या आणि…

बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरामध्ये जोरदार हंगामा होताना दिसतोय. विशेष म्हणजे नुकताच बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांसाठी एक टास्क देण्यात आला. यावेळी घरात मोठा वाद झाल्याचे बघायला मिळाले. या आठवड्याचे नॉमिनेशन झाले. यानंतर घरात वादळ आल्याचे बघायला मिळाले. निकी तांबोळी ही वर्षा उसगांवकर यांनी कॅप्टनशीसाठी सपोर्ट करताना दिसली. आता त्याच निकी तांबोळी हिने बंड केल्याचे बघायला मिळतंय. निकी तांबोळी हिने म्हटले की, मी घरात काहीच काम करणार नाही. यावरून काही वेळ घरात वातावरण तापल्याचे बघायला मिळाले.

दुसरीकडे नॉमिनेशन प्रक्रियेनंतर जान्हवी किल्लेकर आणि घनश्याम दरोडे अर्थात छोटा पुढारी यांच्यात जोरदार वाद झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर दोघेही एकमेकांना भांडताना दिसले. जान्हवी हिने छोट्या पुढारीबद्दल असे काही शब्द वापरले की, लोक तिच्या विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. भांडणामध्ये चक्क ती धनश्यामला शिव्या देताना देखील दिसली.

जान्हवी म्हणाली की, माझ्याकडे पाहून डोळे दाखवू नको…दम नाहीये तुझ्यात…हेच नाही तर छोटया पुढारीची थेट अक्कल देखील जान्हवी हिने काढली. तुला अजिबात अक्कल नसल्याचे छोट्या पुढारीला म्हणताना जान्हवी ही दिसली आहे. तुला मी घाबरत नसल्याचे म्हणताना देखील छोटा पुढारी हा दिसला आहे. चल निघ…चल निघ…चल निघ…म्हणताना जान्हवी दिसली.

जान्हवी हिने अनेक चुकीचे शब्द घनश्याम याच्याबद्दल बोलले आहेत. ज्यानंतर लोक तिच्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. भांडणामध्ये तिने शिव्या देखील दिल्या आहेत. अनेकांनी म्हटले की, जे काही छोट्या पुढारीला बोलली तेच तुझ्यात हिंमत असेल तर अरबाज पटेल याला बोलून दाखव. घनश्यामला कशाला त्रास देत आहे.

जान्हवीला भाऊच्या धक्क्याला बसू न देण्याचा निर्णय रितेश देशमुख याने घेतला. पॅडी कांबळेबद्दल अत्यंत हैराण करणारे विधान जान्हवी हिने केले होते. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. जान्हवी ही बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त स्पर्धेक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. अगोदर जान्हवी आणि निकी तांबोळी या चांगल्या मैत्रिणी होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;