वयाच्या 47 व्या वर्षी ‘अंगुरी भाभी’ करणार लग्न; या अभिनेत्याची होणार तिसरी पत्नी?

वयाच्या 47 व्या वर्षी ‘अंगुरी भाभी’ करणार लग्न; या अभिनेत्याची होणार तिसरी पत्नी?

‘भाभीजी छत पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे सध्या ‘खतरों के खिलाडी 14’ या रिॲलिटी शोमध्ये झळकतेय. या शोमधील शिल्पाचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतोय. मालिका आणि शोजसोबतच शिल्पा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. 47 वर्षीय शिल्पा अजूनही अविवाहित आहे. तिने नुकताच लग्नाचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे. ज्या अभिनेत्यासोबत शिल्पाच्या लग्नाची चर्चा आहे, त्याचं हे तिसरं लग्न असणार आहे. ‘पवित्र रिश्ता’, ‘बातें कुछ अनकहीं सी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलंय.

याआधी शिल्पा रोमित राजशी लग्न करणार होता. या दोघांचा साखरपुडाही झाला होता. इतकंच काय तर लग्नपत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र ऐनवेळी काही कारणास्तव दोघांनी लग्न मोडलं होतं. त्यानंतर शिल्पाने कधीच लग्नाचा विचार केला नाही. सध्या तिचं नाव अभिनेता करणवीर मेहराशी जोडलं जातंय. करणवीरचं हे तिसरं लग्न असून याआधी त्याची दोनही लग्न अयशस्वी ठरली आहेत. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये शिल्पा आणि करणवीर सोबतच स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. एका स्टंटदरम्यान करणवीरने म्हटलंय की, “जर हा स्टंट आम्ही जिंकला तर आम्ही दोघं लग्न करू.” करणवीरने शोदरम्यान शिल्पाला ‘आय लव्ह यू’ असंही म्हटलं होतं. नंतर करणवीरने जेव्हा तिला लग्नासाठी विचारलं, तेव्हा शिल्पा त्याला म्हणाली, “नाही, गडबड होईल, कोऑर्डिनेशनमध्ये.” त्यावर करण तिला म्हणतो, “नाही होणार गडबड. आपण दोघं मिळून करुया.” शिल्पा आणि करण हे आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्रही आहेत.

करणवीरने 2009 मध्ये बालमैत्रीण देविकाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 2018 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर त्याने 2021 मध्ये गर्लफ्रेंड निधी सेठशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. अखेर लग्नाच्या दोन वर्षांत करणवीरने निधीला घटस्फोट दिला. याविषयी बोलताना निधीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं, “माझ्या मते कोणत्याही नात्यात दररोज भांडणं होत असतील तर ते सहनशक्तीपलीकडे जातं. अशा परिस्थितीत कोणीच एकत्र राहू शकत नाही. मानसिक शांती, एकमेकांसाठी आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं.. या गोष्टी कोणत्याही वैवाहिक आयुष्यात गरजेच्या असतात. कोणत्याही नात्यातील विषारीपणा सहन करता कामा नये.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;