साराला विसरला क्रिकेटर शुभमन गिल, थेट ‘या’ अभिनेत्रीसोबतचे ते फोटो व्हायरल, लोक म्हणाले, प्रेम नक्की…

साराला विसरला क्रिकेटर शुभमन गिल, थेट ‘या’ अभिनेत्रीसोबतचे ते फोटो व्हायरल, लोक म्हणाले, प्रेम नक्की…

अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे सोशल मीडियावरही सक्रिय आहे. मात्र, यावेळी अनन्या पांडे ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे ही काही वर्षांपासून बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. मात्र,यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघांनीही ब्रेकअपवर अजून भाष्य केले नाहीये, यांच्या ब्रेकअपचे कारण हे कळू शकले नाहीये. अनन्या पांडे ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. आदित्य रॉय कपूर याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या यांचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसले. ज्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगताना दिसल्या.

अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या हे अनंत अंबानी याच्या लग्नात धमाल करताना दिसले. हार्दिक पांड्या याचा काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झालाय. आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. ते फोटो पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या यांच्या अफेअरच्या चर्चा असतानाच आता दुसरीकडे अनन्या पांडे आणि शुभमन गिल यांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. दोघेही जबरदस्त अशा लूकमध्ये आहेत. अनन्या पांडे आणि शुभमन गिल यांचे हे फोटो व्हायरल झाल्याने विविध चर्चांना उधाण झाल्याचे बघायला मिळतंय.

अनन्या पांडे आणि शुभमन गिल यांनी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहे आणि व्हायरल होणारे फोटो तेच आहेत. अगोदरच शुभमन गिल याचे नाव सारा अली खान हिच्यासोबत जोडले जाते. त्यामध्येच आता अनन्या पांडे हिच्यासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली. अनेकांनी हे फोटो पाहून शुभमन गिल याला धोकेबाज म्हटले आहे. हेच नाही तर एकाने म्हटले की, हा शुभमन गिल नक्की प्रेम कोणावर करतो?

अनेक वर्ष अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांनी एकमेकांना डेट केले. मात्र, त्यानंतर यांचे ब्रेकअप झाले. काही दिवसांपूर्वी विदेशात अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याच्यासोबत खास वेळ घालवताना दिसली होती. ज्याचे फोटो व्हायरल झाले होते. मुंबईमध्येही कायमच हे दोघे एकत्र स्पॉट होत असत. मात्र, यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;