मुलगा असूनही बाप झालास..; प्रसाद ओकच्या भावूक पोस्टची चर्चा

मुलगा असूनही बाप झालास..; प्रसाद ओकच्या भावूक पोस्टची चर्चा

अभिनेता प्रसाद ओकचा मुलगा सार्थक याने स्वत:च्या वाढदिवशी बाबांना अत्यंत खास भेटवस्तू दिली. ही भेट पाहून प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी दोघंही गहिवरले. इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघांनी मुलासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. मुलगा असूनही बाप झालास, असं प्रसादने म्हटलंय. तर मंजिरीनेही दोन्ही मुलांबद्दल वाटणारा अभिमान व्यक्त केला. सार्थकने प्रसादला BMW ही अत्यंत महागातली गाडी भेट म्हणून दिली. त्याचा व्हिडीओसुद्धा प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद आणि मंजिरी यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे.

प्रसाद ओकची पोस्ट-

‘सार्थक.. मुलगा असूनही ‘बाप’ झालास. अत्यंत अभिमान वाटतो तुझा. देव कायम तुझ्या पाठिशी राहो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. खूप खूप खूप प्रेम,’ अशा शब्दांत प्रसादने भावना व्यक्त केल्या आहेत.

मंजिरी ओकची पोस्ट-

सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची.. तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता (अजूनही आहे). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला (म्हणजे 3 सप्टेंबर 2002 ) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्याने तुला ही सायकल सरप्राइज गिफ्ट म्हणून आणली होती. पण त्याला काळजी की तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्याने तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना). त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्यानंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद (लहान मुलासारखा) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे. त्याचं कारण म्हणजे, आज 22 वर्षांनी (3 सप्टेंबर 2024) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राईज गिफ्ट दिलीस. मी नको म्हणाले तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही (त्याऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल). माझ्याकडे शब्द नाहियेत सार्थक. फक्त एवढंच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंकचा पण. खूप मोठ्ठा हो. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रसाद ओक लवकरच ‘धर्मवीर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धर्मवीर’मध्ये प्रसादने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;