Nagar News नगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि कारची धडक; एक ठार, दोन जखमी

Nagar News नगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि कारची धडक; एक ठार, दोन जखमी

नगर दौंड महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू झाली आहे. या महामार्गावर सलग चौथा अपघात झाला आहे.

संभाजीनगरकडून दौंडकडे एर्टिगा गाडी ही आज सकाळी जात होती. तर ट्रक नगरच्या दिशेने येत होता. महामार्गावर काळेवाडी या ठिकाणी या दोन्ही गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. तर अन्य काहीजण गाडीमध्ये अडकून पडलेले होते. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले व ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य केले. गाडीमध्ये अडकल्यांना बाहेर काढले त्यांच्या हाता पायाला तसेच डोक्याला इजा झालेली आहे. त्यांच्यावर नगरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे जखमी संभाजीनगर जिल्ह्यातील असावे असा अंदाज आहे. अद्यापपर्यंत या अपघातात मृताची ओळख पटलेली नाही.

नगर दौंड महामार्गावर सलग चौथा अपघात झालेला आहे. या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या घटना या घडलेल्या असल्यामुळे या महामार्गावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुद्धा अनेक वेळेला करण्यात आली आहे. मात्र याकडे दूर्लक्ष करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सलग घडलेल्या या अपघाताच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;