विनय आपटे प्रतिष्ठानची शॉर्ट फिल्म स्पर्धा

विनय आपटे प्रतिष्ठानची शॉर्ट फिल्म स्पर्धा

प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे  लघु चित्र (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या वर्षी  कुठल्याही विषयावर शॉर्ट फिल्म्स पाठवता येतील. शॉर्ट फिल्म्स जास्तीत जास्त 20 मिनिटांची असावी. त्यासाठी 25 वर्षांखालील आणि 25 वर्षांवरील  असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत. तसेच  शॉर्ट फिल्म्स मराठी, हिंदी  आणि इंग्रजी भाषेत पाठवता येतील. स्पर्धेत सादर होणाऱ्या सर्व शॉर्ट फिल्म्स ‘प्लानेट मराठी’ ओटीटी चॅनेलवर दाखवण्यात येतील.

प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. दोन्ही गटातील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिक [email protected] या संकेतस्थळावर 15 नोव्हेंबरपर्यंत पाठवायच्या आहेत. प्रवेश मूल्य रुपये 500 आहे.  स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघधरे, जाहिरात तज्ञ भरत दाभोळकर, ज्येष्ठ चित्रपट  संकलक भक्ती मायाळू आणि लेखिका – गीतकार रोहिणी निनावे हे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;