‘सोनपरी’चं रियुनियन… आता कशी दिसते फ्रुटी, खास फोटो पोस्ट करत म्हणाली…

‘सोनपरी’चं रियुनियन… आता कशी दिसते फ्रुटी, खास फोटो पोस्ट करत म्हणाली…

लहानपणीचे दिवस प्रत्येकाला आवडतात. पण 90 दशकातील मुलांना काही आठवणी कधीच विसरता येणार नाहीत. ‘सोनपरी’, ‘शाका लाका बुमबुम’, ‘शक्तीमान’, ‘करिश्मा का करिश्मा’ यांसारख्या भन्नाट मालिकांमुळे बालपण आणि खास ठरलं. ‘सोनपरी’ मालिकेने तर अनेकांच्या मनावर राज्य केलं. आजही मालिकेची चर्चा 90 च्या दशकातील मुलांमध्ये रंगलेली असते. एवढंच नाही तर, बालपणी शाळेत ‘सोनपरी’ मालिकेवर चर्चा रंगायची. मालिकेला जवळपास 24 वर्ष झाली आहे. पण चाहत्यांच्या मनात मालिकेसाठी असलेली क्रेझ कमी झालेली नाही.

मालिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘सोनपरी’ ही भूमिका साकारली होती. अभिनेते अशोक लोखंडे यांनी अल्टू अंकल भूमिकेला न्याय दिला. तर फ्रुटी ही भूमिका तन्वी हेगडे हिने बजावली होती. तन्वी जवळ कायम तिचे अल्टू अंकल आणि सोनपरी असायचे. मालिके दिसणारी फ्रुटी आता मोठी झाली आहे. 24 वर्षांनंतर तन्वी हिने अल्टू अंकल आणि सोनपरी यांच्यासोबत फोटो पोस्ट केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanvi Hegde (@tanvihegde)

 

अल्टू अंकल आणि सोनपरी यांच्यासोबत फोटो पोस्ट करत तन्वी हिने खास कॅप्शन देखील दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फ्रुटी हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. फोटो पोस्ट तन्वी म्हणाली, ‘अनेक जण मला विचारतात तुम्ही आजही भेटता का, एकमेकांच्या संपर्कात आहात का, पुन्हा एकत्र कधी दिसाल… आज आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली. हे माझे सेटवरचे पालक आहेत आणि बेस्ट सहकलाकार… आठलणींना उजाळा मिळाला…’ असं तन्वी म्हणाली.

सांगायचं झालं तर, तन्वी ‘वरवरचे वधू’ नाटक पाहण्यासाठी आली होती. तेव्हाच तन्वी, मृणाल आणि अशोक यांची भेट झाली. तेव्हाच तिघांना एकत्र फोटो क्लिक आणि चाहत्यांना एक खास झलक दाखवली. तिघांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘लहानपणीच्या आठवणी…’, ‘आठवणी पुन्हा जगता आल्या तर…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘कमबॅक करण्याची विनंती आहे.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आणखी एक सीझन…’, असं म्हणत चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;