क्रिप्टो करन्सीमधून जास्त कमाविण्याचा मोह महागात पडला, सायबर भामटय़ांकडून लाखो रुपयांचा गंडा

क्रिप्टो करन्सीमधून जास्त कमाविण्याचा मोह महागात पडला, सायबर भामटय़ांकडून लाखो रुपयांचा गंडा

इन्स्टाग्रामवरील क्रिप्टो करन्सी-सुलतान 02 या ग्रुपच्या माध्यमातून कोलकातातील सायबर भामटय़ांनी मुंबईतील एका तरुणाला जास्त नफा मिळवून देण्याची बतावणी करत पावणेतीन लाखाला चुना लावला. परंतु डी. बी. मार्ग पोलिसांनी तपास करत सय्यद मो. अतेहसमुल इबारूल हक,  इम्रान सय्यद अली या दोघांना पकडले आणि दीड लाखाची रोकड हस्तगत केली.

मालाड येथे राहणारा अहमद सलीम अन्सारी (22) इन्स्टाग्रामवरील करन्सी-सुलतान 02 या ग्रुपचा सदस्य बनला होता. तेथे तो नियमित चॅटिंग करायचा. तू क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केलीस तर चांगला नफा मिळेल असे आमिष त्याला आरोपींनी दाखवले. त्यावर विश्वास ठेवून त्याने दोन लाख 84 हजार रुपये आरोपींनी पाठविलेल्या क्यूआर कोडवरून पाठविले. पण नंतर आरोपींनी त्याला टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अन्सारीने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे, निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम डिगे, उपनिरीक्षक अभिषेक अरडक, अंमलदार सूरज धायगुडे व पथकाने तपास सुरू केला. अन्सारी याचे पैसे कोलकाता येथील एका बँक खात्यात जमा झाल्याचे व तेथीलच एका एटीएममधून काढल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पथकाने कोलकाता गाठले आणि या दोघांना पकडून आणले.

पुरावे नष्ट, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू

आरोपींचा तिसरा साथीदार फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांना आपल्या विरोधात सबळ पुरावे मिळू नये याकरिता आरोपींना ते इन्स्टाग्राम वापरत असलेला मोबाईल तोडून फोडून फेकून दिला. आरोपीने सदरचे इन्स्टाग्राम खाते खोलून तो हक याला विकले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;