सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना जेलमध्ये दाऊद गँगकडून धोका

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना जेलमध्ये दाऊद गँगकडून धोका

बॉलिवूडचा ‘दबंग’ हिरो सलमान खान याच्या घरावर बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली होती. बिश्नोई गँगकडून वारंवार सलमान खानला टार्गेट केलं जात आहे. सलमान खानला आधी धमकीचे फोन, पत्र पाठवले जात होते. यानंतर सलमानच्या राहत्या घरावर गॅलक्सी अपार्टमेंटवर आरोपींनी गोळीबार केला. एवढंच नाही तर बिश्नोई गँगच्या आरोपींनी सलमानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊस परिसरात रेकी केल्याचीदेखील माहिती समोर आली होती. पोलिसांकडून या प्रकरणी अतिशय जलद गतीने तपास करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी सलमानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या काही कालावधीत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. यापैकी पोलिसांनी एका आरोपीच्या तर परराज्यातील मुसक्या आवळल्या होत्या.

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी बिश्नोई गँगमधील आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली होती. या दोन्ही आरोपींना आता मोठा दावा केला आहे. हे आरोपी नवी मुंबईच्या तळोजा येथील जेलमध्ये कैद आहे. या जेलमध्ये आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांपासून धोका असल्याचा दावा आरोपींनी केला आहे. त्यामुळे त्यांनी जेल प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. डी गँगचे आरोपी हे कोणत्या तरी वेगळ्या प्रकरणात जेलमध्ये कैद आहेत. ते आपल्याला मारण्याची प्लॅनिंग आखत असल्याचा दावा बिश्नोई गँगचे आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी केला आहे. याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून नेमकी बातमी काय?

सलमान खान गोळीबार प्रकरणातील जबाबदार असणाऱ्या बिश्नोई टोळीतील 2 आरोपींना जीवाला धोका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये दाऊद गँगचे काही आरोपी शिक्षा भोगत आहेत. त्यांच्याकडूनच बिश्नोई टोळीतील या दोन आरोपींच्या जीवाला धोका आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. या प्रकरणी आता नवी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की गुप्ताच्या भावाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, जेल अधीक्षक, गृह मंत्रालय आणि बिहार सरकार यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात सविस्तर भूमिका मांडण्यात आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे विक्की गुप्ता आणि सागर पाल कैद असणाऱ्या जेलमध्ये डी गँगचे आरोपीदेखील आहेत. बिश्नोई गँगने सलमानच्या घरावर गोळीबार केल्याने त्यांच्या मनात संताप आहे. त्यामुळे त्यांनी अटकेतील दोघांना धमकी दिली आहे, असा दावा पत्रात करण्यात आला आहे. या पत्रात विक्की आणि सागरच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;