ट्रान्सजेंडर महिलेला मिळाला प्रेमात धोका, 73 तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून घेतला बदला!

ट्रान्सजेंडर महिलेला मिळाला प्रेमात धोका, 73 तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून घेतला बदला!

प्रेमात धोका मिळाल्यावर तरुण तरुणी वाटेल त्या थराला जातात. प्रेमात आंधळा झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यात बदल्याची भावना असेत. त्यामुळे चुकीच्या मार्गांचा अवलंबा केला जातो. अशा अनेक घटना जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या आहेत. जपानमध्ये अशीच एक घटना घडली असून प्रेमात धोका मिळाल्यामुळे एका ट्रान्सजेंडर महिलेने 73 जणांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना करोडोंचा चुना लावला आहे.

साउथ चाइना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एका 49 वर्षीय ट्रान्सजेंडर महिलेला जपानमधील एका व्यक्तीने प्रेमात धोका दिला होता. त्यामुळे तिच्या मनात जपानी पुरुषांबद्दल सुडाची भावना निर्माण झाली. त्यानंतर तिने एक एक करत तब्बल 73 जपानी पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने त्यांना 7 करोड 38 लाख रुपयांना गुंडाळले आहे. सदर घटना उघडकीस येताच महिलेला अटक करण्यात आले आहे. “कॉलेजमध्ये असताना मला प्रेमात धोका मिळाला होता. त्यानंतर मागील 13 वर्षांपासून मी जपानी पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवत असल्याचे, महिलेने पोलिसांसमोर कबुल केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;