भ्रष्टाचाराची कागदपत्रं गळ्यात घालून अजगरासारखं सरपटत गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय, भाजपच्या राज्यात न्यायासाठी धडपड

भ्रष्टाचाराची कागदपत्रं गळ्यात घालून अजगरासारखं सरपटत गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय, भाजपच्या राज्यात न्यायासाठी धडपड

मध्य प्रदेशातील निमच जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात चौकशी आणि पुराव्याची कागदपत्रे उपलब्ध करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, एका व्यक्तीने ढिम्म नोकरशाही आणि सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. तक्रारदाराने अर्ज आणि पुराव्याच्या कागदपत्रांची लांबलचक माळ बनवली, ती स्वत:भोवती गुंडाळून अजगरासारखं सरपटत जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. तिथे त्याने भ्रष्टाचार प्रकरणी नवीन जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

गावातील मुकेश प्रजापती हे निमच जिल्ह्यातील पंचायत कांकरिया तलावामध्ये बांधकाम आणि विकासकामांच्या नावाखाली तत्कालीन सरपंच आणि त्यांच्या पतीवर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. मुकेश यांनी याआधी लोकायुक्तांकडे तक्रार केली आणि मुख्यमंत्र्यांनाही कळवले. पण निमच प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

पूर्व सरपंच पुष्पाबाई आणि त्यांच्या पतीने कांकरिया तलावालगतच्या जमीनी बळकाऊन सव्वा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. त्याचे पुरावे देखील सादर करण्यात आले होते, मात्र आता त्याच्या तपासातही भ्रष्टाचार होत असल्याचे मुकेश यांचे म्हणणे आहे. मुकेश यांनी तत्कालीन जिल्हा पंचायत सीईओ गुरुप्रसाद यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि ईडीकडे चौकशीची मागणी केली. मुकेश प्रजापती अर्ज घेऊन अजगरासारखे रेंगाळत जिल्हाधिकारी कार्यालयात आले तेव्हा त्यांचे कपडेही फाटले. मुकेशला अश्या अवस्थेत पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले

मुकेशला अशा अवस्थेत पाहताच एसडीएम ममता खेडे आणि इतर अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुकेशला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वेळा निवेदन करूनही ऐकले जात नसल्याचे मुकेशने सांगितले. आपल्याला न्याय हवा आहे. मुकेश यांनी संपूर्ण प्रकरण जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी हिमांशू चंद्रा यांना सांगितले. सध्या या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;