बांगलादेशने पाकिस्तानला गुंडाळले, …भविष्यासाठी हा वाईट संकेत; जावेद मियांदादची प्रतिक्रिया

बांगलादेशने पाकिस्तानला गुंडाळले, …भविष्यासाठी हा वाईट संकेत; जावेद मियांदादची प्रतिक्रिया

रावळपिंडीमध्ये बांगलादेशने 2-0 ने पाकिस्तानचा सुपडा साफ करत ऐतेहासिक मालिका विजय साजरा केला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच बांगलादेशने पाकिस्तानला घरच्या मैदानावर धुळ चारली आहे. मात्र हा लाजिरवाणा पराभव चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर माजी कर्णधार जावेद मियांदादने संघाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, हे खूपच वेदनादायक असून आपल्या खेळाचा स्तर इतका खालावला आहे. बांगलादेशला त्यांच्या चांगल्या प्रदर्शनासाठी विजयाचे श्रेय दिले पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने आपली फलंदाजी ढासाळली आहे, तो भविष्यासाठी  एक वाईट संकेत आहे, अशी चिंता जावेद मियांदादने व्यक्त केली. तो पुढे म्हणाला की, मी फक्त खेळाडूंना दोष देणार नाही. मात्र मागच्या दीड वर्षात PCB मध्ये जे काही चालू आहे. तसेच कर्णधार आणि व्यवस्थापनामध्ये झालेल्या बदलामुळे त्याचा परिणाम संघावर झाला आहे, असे म्हणत जावेद मियांदादने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सुद्धा टीका केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;