“शिवीगाळ करणाऱ्याला, आदळाआपट करणाऱ्याला भाऊच्या धक्क्यावर स्थान, पण…”; जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईंचा संताप, म्हणाली “तिने केलेल्या चुका…”

“शिवीगाळ करणाऱ्याला, आदळाआपट करणाऱ्याला भाऊच्या धक्क्यावर स्थान, पण…”; जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईंचा संताप, म्हणाली “तिने केलेल्या चुका…”

Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक सुपरहिट कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठीला ओळखले जाते. बिग बॉस मराठीचा सहावा आठवडा सुरू आहे. या आठवड्याच सुरुवातीपासूनच घरातील सदस्यांची वादावादी पाहायला मिळते. सध्या बिग बॉस मराठीतील स्पर्धक जान्हवी किल्लेकर ही चांगलीच चर्चेत आहे. जान्हवी किल्लेकरने केलेल्या चुकीमुळे तिला एक आठवडा जेलमध्ये राहण्याची शिक्षा मिळाली होती. त्यानंतरही दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बसण्यास मनाई करण्यात आली. आता यावरुन जान्हवी किल्लेकरच्या कुटुंबातील व्यक्तीने संताप व्यक्त केला आहे.

जान्हवी किल्लेकरची जाऊबाई असलेल्या संध्या किल्लेकरने नुकतीच एक पोस्ट टाकली आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने जान्हवीने १ आठवडा शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान मिळाल नाही. पण तुझ्या Strong, Fair & Individual Game ने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा जागा मिळव… We Will Always Support You.. जाह्नवी समर्थक, असे म्हटले आहे.

संध्या किल्लेकर काय म्हणाल्या?

“घरातील वस्तुंची आदळाआपट करुन Big Boss House चे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे…

टास्क मध्ये आक्रमकता दाखवून Physically Violent होण्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे…

घरातीलच एका सदस्यावर शिवीगाळ करून Bip Bip.. ऐकु येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण साधी चर्चाही नाही.. पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे…

आणि जाह्रवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही, घरातील व प्रेक्षकांची मनापासून माफीमागुनही, प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगुनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही…

हे खरंच खुप Unfair आहे जाह्नवी साठी.. घरातील इतर सदस्यांप्रमाने तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे”, असे संध्या किल्लेकरने म्हटले आहे.

संध्या किल्लेकरच्या या पोस्टवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. “ती पण चुकीचं बोलली, कोणाची लायकी काढायची म्हणजे झालं काय, तिला फक्त तिच्या कुटुंबातील लोक सपोर्ट करतात. शेवटी घरातूनच ती हे सर्व शिकली आहे….लवकरच बाहेर जाईल”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने “मी अंकिताला सपोर्ट करतो, पण या वाक्यासाठी मी पण सहमत आहे”, असे म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;