‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीची मनमानी; नेटकऱ्यांचा भडकले, हिला आधी घराबाहेर काढा!

‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीची मनमानी; नेटकऱ्यांचा भडकले, हिला आधी घराबाहेर काढा!

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गेल्या आठवड्यात अरबाजचं रौद्र रुप पाहायला मिळालं होतं. यंदाच्या या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात कोण रद्दी ठरलं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये अनेकांचे नंबर लागले आहेत. असं असतानाच बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात निक्की तांबोळीही मनमानी करताना दिसतेय. तिची ही मनमानी प्रेक्षकांना मात्र पटलेली दिसत नाही.

बिग बॉसच्या नव्या प्रोमोत नेमकं काय?

बिग बॉसचा नवा प्रोमो कलर्स मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात बोलणं सुरु आहे. मी कोणतीही ड्यूटी करणार नाही, असं निक्की म्हणते. त्यावर वर्षा निक्कीला म्हणतात,”तू अशी मनमानी करू शकत नाहीस.” हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या निक्कीला आधी घराबाहेर काढा, अशी कमेंट नेटकऱ्याने या व्हीडिओवर केलीय.

आजच्या भागात निक्की बिग बॉसचे अनेक नियम मोडताना दिसणार आहे. तर निक्की झोपंचं नाटक करताना दिसेल. त्यावर आर्या जाधव मात्र भडकली आहे. आर्या तिच्यावर थंड पाणी ओतणार असल्याचं म्हणतेय. त्यामुळे नियम मोडल्यामुळे आता निक्कीला बिग बॉस काय शिक्षा देणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यावेळी कोण- कोण नॉमिनेट होणार?

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दराडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? कोण बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;