KBC 2024 – अमिताभ बच्चनची भेट व्हावी म्हणून 96 दिवसांचा उपवास
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन बे पुन्हा ‘कौन बनेगा करोडपती 16’ व्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहेत. या शो ने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबीयांना आशेचा किरण दाखवला आहे. आतापर्यंत हजारो स्पर्धक या शोच्या हॉटसीटवर बसले आहेत. मात्र पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये एक असा स्पर्धक सहभागी झाला आहे, ज्याने अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी एक दोन दिवसांचा नव्हे तर 96 दिवसांचा उपवास केला.
‘कौन बनेगा करोडपती 16’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर श्रीम शर्मा बसला आहेत. श्रीमच्या या शोमध्ये जाईल, असे त्याच्या आईचे स्वप्न होते. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रीमने केबीसीची सर्व आव्हाने पूर्ण केली आणि अखेर अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसण्याची त्याला संधी मिळाली. अमिताभ यांच्यासमोर बसल्यानंतर श्रीम भावूक झाला आणि बिग बी यांच्यासमोर बसून आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले आणि तो फार आनंदी आहे. या दरम्यान त्याने अमिताभ यांच्यासमोर एक मजेदार खुलासाही केला.
श्रीम हा व्यवसायाने ज्योतिषी आहेत. त्याला या गोष्टीचा अंदाजही नव्हता की तो एक दिवस अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये सहभागी होईल. ‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये येऊन अमिताभ यांच्यासमोर हॉटसीटवर बसण्यासाठी श्रीमने 97 दिवसांचा उपवास केला होता. या उपवासावेळी त्याने दोन्ही वेळेचे जेवण सोडले होते. कारण त्याच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला आयुष्यात एखादी मोठी गोष्ट मिळवायची असेल त्यासाठी मोठ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. श्रीम याची कहाणी ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केबसीच्या सेटवर त्याच्या आवडीची मिठाई आणि रसमलाई मागवून त्याच्या उपवास सोडवला.
आपल्या आयुष्यातील मनोरंजक गोष्टी अमिताभ बच्चन यांच्यासोबत श्रीमने शेअर केल्या. सुरुवातीपासून एक चांगला क्रिकेटपटू व्हायचं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने तयारी सुरू केली होती. मात्र एक अपघात झाला आणि त्या अपघातात दुखापत झाल्याने त्याचं स्वप्न स्वप्नचं राहिले. वास्तविक, श्रीम यांचं संपूर्ण कुटुंब ज्योतिष क्षेत्रात आहे आणि त्यामुळेच त्यांनी ज्योतिषात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 97 दिवसांच्या उपवासात श्रीम याने फक्त फळे खल्ली. पण आता तो पुन्हा अन्न खाऊ शकतो. खुद्द अमिताभ बच्चनही त्याचं बोलणं ऐकून काही काळ स्तब्ध झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List