Yavatmal News- नदीच्या पुरातून जाऊन 10 किमी अंतरावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ; स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांचा संताप

Yavatmal News- नदीच्या पुरातून जाऊन 10 किमी अंतरावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ; स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांचा संताप

>> यवतमाळ : प्रसाद नायगावकर

देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा केला जात असतांना ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधा वानवा बघायला मिळतेय. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक येथील एका जेष्ठ नागरिकाचे ह्रदयविकाराने उपचारा दरम्यान निधन झाले. दरम्यान या ज्येष्ठ नागरिकाचे अंतविधी करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. या गावात पक्की बांधलेली स्मशानभूमीच नाहीय. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना बराच त्रास सहन करावा लागला. दरम्यान गावातील परंपरागत स्मशानभूमीत नदीचा पूर जात असल्याने नातेवाईकांना 10 किमी अंतरावर असलेल्या शेंबाळेश्वर देवस्थान येथे मृत व्यक्तीचे पार्थिव नेत त्यांच्यावर तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागण्याची घटना समोर आली आहे.

पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक येथील जेष्ठ नागरिक पंजाबराव माधवराव देशमुख (70) यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ पुसद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.  मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गावातील परंपरागत अंत्यविधीच्या ठिकाणी पैनगंगा नदीचा पूर वाहत होता. शिवाय गावात कुठली ही पक्की स्मशानभूमी नसल्याने ऐन पावसात अंत्यविधी करायचा कसा असा यक्ष प्रश्न गावकरी आणि नातेवाईकांना पडला. त्यांनतर नातेवाईकांनी गावापासून 10 किमी दूर असलेल्या शेंबाळेश्वर देवस्थानच्या परिसरातील स्मशानभूमीत पार्थिव नेत अंत्यविधी करावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;