Jalna News – जिल्ह्यातील पद्मावती पाठोपाठ धामणा धरणही ओहरफ्लो

Jalna News –  जिल्ह्यातील पद्मावती पाठोपाठ धामणा धरणही ओहरफ्लो

जालना जिल्ह्यातील पारधपासून जवळच असलेले पद्मावतीच्चा धरण पाठोपाठ शेलुद येथील धामणा धरण आज सकाळी १०० टक्के भरले असून परिसरातील 25 ते 30 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

यावर्षी पावसाने सुरवातीस थोडा विलंब केला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजी निर्माण झाली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून पावसाने दमदार सुरूवात केली असून मागील आठवड्यात भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरण ओहरफ्लो झाले आणि लेहा ,शेलुद, वडोद तांगडा,जळगाव सपकाळ, हिसोडा यांच्यासह अनेक गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर आज दि,2 सप्टेंबर रोजी पद्मावती पाठोपाठ धामणा धरणही ओहरफ्लो झाले आहे यामुळे पद्मावती धरणाने पारधसह परिसरातील वालसावगी,पारध खुर्द, पद्मावती, वाढोणा, विझोरा तर बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ, तरारखेड, गुम्मी, धामणगाव, मढ, पाडळी देऊळघाट आदी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून दमदार पावसाने नदी नाले खळखळ वाहत आहे. शेतातील विहीरीही वरून वाहत आहे असे असले तरी ‘कही गम कही खुशी’याप्रमाणे गेल्या दोन दिवसातून पासून पडणाऱ्या सततच्या पावसाने पिकावर याचा परिणाम होत आहे.  सोयाबीन सडण्यास सुरवात झाली असून उडीद मुंग ,तीळ हे पिके हातची गेली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;