अंतराळात सुनीता, विल्मोर यांना ऐकू येत आहेत विचित्र आवाज, जाणून घ्या काय आहे घटना…

अंतराळात सुनीता, विल्मोर यांना ऐकू येत आहेत विचित्र आवाज, जाणून घ्या काय आहे घटना…

गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची सुनिता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांनी बोईंग स्टारलायनर स्पेसक्राप्टमध्ये एक नवीन समस्या आल्याचे सांगितले आहे. विल्मोर यांनी दावा केला आहे की, त्यांनी या स्पेसक्राप्टमध्ये एक विचित्र प्रकारचा आवाज ऐकला आहे.

मिशिगनच्या मीट्रियोलॉजिस्ट रॉब डेल यांनी विल्मोर आणि मिशन कंट्रोलमध्ये झालेला संवाद सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान विल्मोर आपला फोन स्पीकरच्या दिशेने करतात, कारण मिशन कंट्रोलचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. पहिल्यांदा स्पष्ट ऐकू न आल्याने ते पुन्हा प्रयत्न करताना दिसत आहेत.

मिशन कंट्रोलच्या माहितीनुसार, हा आवाज असा आहे, जसे कोणीतरी संदेश पाठवत आहे. प्राथमिक तपासात कळले की, हा आवाज स्पेसक्राफ्टमधील स्पीकरमधून येत होता. सध्या मिशन कंट्रोलने बुच विल्मोर यांना आश्वस्त केले की,  तो आवाज अॅनेलिसिस करून लवकरच त्याबाबत माहिती देऊ. बोईंग स्टारलायनर स्पेस्क्राफ्टमधील बिघाडामुळे ते क्रू शिवाय परत आणले जात आहे. सध्या अंतराळवीर विल्मोर आणि सुनीता विल्यम्स 2025 ला परतणार आहेत.

दोन्ही अंतराळवीर दोन महिन्याहून अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये आहेत. बोईंग स्टारलायनरमध्ये बिघाड झाल्याने दोन्ही अंतराळवीरांची परती फेब्रुवारी 2025 पर्यंत रखडली आहे. हे मिशन केवळ आठ दिवसांचे होते, मात्र हिलीयम लीक आणि थ्रस्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांचा परतीचा मार्ग रखडला. आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना एलन मस्क यांची कंपनी SpaceXच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलने परत आणले जाईल. 24 सप्टेंबर 2024 ला Crew-9 या मिशनला लॉन्च केले जाईल.

आधी Crew-9 मिशनसाठी चार अंतराळवीर जाणार होते, मात्र आता फक्त दोन अंतराळवीर जातील. याचे कारण म्हणजे परतताना सुनीता आणि बुच यांना परत आणले जाऊ शकेल. त्यामुळे दोन अंतराळवीरांना थांबवून त्यांना पुढच्या मिशनसाठी पाठवण्यात येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;