करीना कपूरची होणारी वहिनी आहे तरी कोण? झगमगत्या विश्वापासून दूर पण कोट्यवधींची मालकीण

करीना कपूरची होणारी वहिनी आहे तरी कोण? झगमगत्या विश्वापासून दूर पण कोट्यवधींची मालकीण

अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता करीना तिच्या भावामुळे चर्चेत आली आहे. करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचा भाऊ आदर जैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आदर जैन याने होणाऱ्या पत्नीला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली आहे. सध्या सर्वत्र दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदर जैन याने लेडीलव्ह अलेखा आडवाणी हिला समुद्रकिनारी प्रपोज करत लग्नाची मागणी घातली आहे.

आदर आणि अलेखा यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशात कपूर कुटुंबाची होणारी सून नक्की कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र कपूर कुटुंबाच्या होणाऱ्या सुनेची चर्चा रंगली आहे.

अलेखा आडवणी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, करीना – करिश्मा यांची होणारी वहिनी कोणी अभिनेत्री नाही तर, एक उद्योजिका आहे. मुंबईत अलेखा हिचा व्यवसाय आहे. 2016 मध्ये अलेखा हिने न्यूयॉर्क येथील कॉर्नेल हॉटेल स्कूलमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवाय अनेक कंपन्यांमध्ये अलेखा हिने नोकरी देखील केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadar Jain (@aadarjain)

 

नोकरी केल्यानंतर अलेखा हिने ‘Way well’ लॉन्च केलं. ‘Way well’ कंपनी वेलनेसला पाठिंबा देणारी कंपनी आहे. अलेखा ‘Way well’ कंपनीची क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे आहे. शिवाय अनेक क्लोदिंग आणि ज्वेलरीच्या ब्राँडसाठी अलेखा हिने मॉडेलिंग देखील केली आहे. व्यवसायाच्या माध्यमातून अलेखा कोट्यवधींची कमाई करते. अलेखा हिने फक्त मुंबईमध्ये नाही तर परदेशात देखील काम केलं आहे. आता अलेखा व्यवसाय संभाळत आहे.

आदर जैन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आदर जैन ही रीमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. रीमा जैन दिग्गज अभिनेते राजकपूर यांची मुलगी आहेत. आदर याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण आदर याने इतर अभिनेत्यांप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख अद्याप तयार केलेली नाही.

आरदर याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तारा सुतारिया हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात अलेखा हिची एन्ट्री झाली. आता अलेखा आणि आदर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आदर आणि अलेखा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;