जातनिहाय जनगणनेला संघाचा पाठिंबा

जातनिहाय जनगणनेला संघाचा पाठिंबा

जातनिहाय जनगणना व्हायलाच हवी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लावून धरलेली असताना व भाजपमधून त्याविरोधी सूर असताना भाजपची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातनिहाय जनगणेनेचे समर्थन केले आहे. समाजाच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना केली पाहिजे; मात्र या आकडेवारीचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ नये, असे संघाने आज नमूद केले.

केरळमधील पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीनंतर मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जातनिहाय जनगणनेबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली. मागासवर्गीय समाजाला सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारकडे जातीसंदर्भातील आकडेवारी असणे आवश्यक आहे. अशी आकडेवारी गोळा करण्याची पद्धत जुनीच आहे. सध्याच्या सरकारद्वारे पुन्हा ही आकडेवारी गोळा केली जाऊ शकते. मात्र, या आकडेवारीचा वापर केवळ मागासवर्गीयांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी व्हायला हवा. या आकडेवारीचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ नये, असे आंबेकर म्हणाले.

भाजपची गोची

काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्ष सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. एनडीएचा घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि लोक जनशक्ती पक्षानेही याचे समर्थन केले आहे. भाजपने मात्र ही मागणी म्हणजे हिंदू धर्मात फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, अशी टीका केली आहे. संघाने मांडलेल्या भूमिकेने भाजपची गोची झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार

सामाजिक आणि जात-आधारित जनगणना ही धोरणात्मक बाब आहे. शासनाच्या अखत्यारीतील हा विषय येतो. सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही, असे आज यासंदर्भातील एक जनहित याचिका फेटाळून लावताना न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सांगितले. आर. प्रसाद नायडू यांनी अॅड. श्रावण कुमार करनम यांच्यामार्फत ही तातडीची याचिका दाखल केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;