घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय थेट पोहोचली जलसा बंगल्यावर, ‘ते’ फोटो पुढे, मुलगी आराध्या बच्चनही…

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय थेट पोहोचली जलसा बंगल्यावर, ‘ते’ फोटो पुढे, मुलगी आराध्या बच्चनही…

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू आहे. हेच नाही तर यांच्यातील वाद इतका जास्त वाढलाय की, हे दोघे घटस्फोट घेणार आहेत. मध्यंतरी काही रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असून ती मुलगी आराध्या हिच्यासोबत तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहोचली होती. दुसरीकडे बच्चन कुटुंबिय एकत्र आले. हे पाहूनच परत एकदा घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा हा बंगला श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आणि तीच गोष्ट ऐश्वर्या राय हिला अजिबात आवडली नसल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही जलसा बंगल्यात राहत नाहीये. आता नुकताच ऐश्वर्या राय ही जलसा बंगल्याबाहेर स्पॉट झालीये. ऐश्वर्या ही मुलगी आराध्या हिच्यासोबत दिसली.

ऐश्वर्या राय आणि आराध्या एकत्र जलवा बंगल्यात जाताना दिसल्या. ऐश्वर्या राय तिच्या कारमधून जलसा बंगला येथे पोहोचली. यावेळी ती हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. मोकळे केस आणि सनग्लासेसमध्ये जबरदस्त ऐश्वर्या दिसत होती. आराध्याने पांढरा टी शर्टसोबत काळी पँट घातली. बऱ्याच दिवसानंतर आराध्या जलसा बंगल्यावर पोहोचली. 

ऐश्वर्या ही मुलगी आराध्या हिच्यासोबत परत एकदा जलसा बंगल्यावर राहण्यास आल्याची चर्चा आहे. खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद मिटला का? हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही विदेशात जाताना दिसली. यावेळी अभिषेक बच्चन ऐश्वर्या हिच्यासोबत दिसला नाही.

सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा असताना त्यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. लग्न करण्याच्या अगोदर दोघेही एकमेकांना डेट करताना दिसले. अभिषेक बच्चन याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खानला डेट करत होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;