राहुल गांधींचा मोठेपणा… गरजू मोच्याला पाठवले चपला बनविण्याचे सामान; म्हणाले, हे वापरून व्यवसाय सुरू कर

राहुल गांधींचा मोठेपणा… गरजू मोच्याला पाठवले चपला बनविण्याचे सामान; म्हणाले, हे वापरून व्यवसाय सुरू कर

काँग्रेस नेते राहुल गांधी कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ते चर्चेत आले आहेत ते एका मोच्याला केलेल्या मदतीमुळे. राहुल गांधी यांनी सोमवारी सुल्तानपुरचा मोची रामचेतला चपला बनविण्याचे साहित्य पाठवले आहे. आज सामान घेऊन त्याच्या दुकानावर पोहोचलेल्या लोकांनी ते सामान राहुल गांधी यांनी पाठविल्याचे सांगितले. त्या सामानामुळे त्याचा व्यवसाय उभारण्यासाठी त्याला मोठा हातभार मिळालेला आहे.

रामचेत या मोच्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राहुल गांधी यांनी कच्च्या मालासोबत  लहान-लहान मशिनही पाठवल्या आहेत. यामध्ये चामडे, लेदरपेस्ट, धागा, सुई आदी शिवणकामाचे साहित्य आहे. आजबाजूच्या लोकांना याबाबत माहिती मिळताच रामचेतच्या दुकानावर गर्दी झाली होती.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी एका प्रकरणाच्या संदर्भात सुलतानपूरमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी रामचेतच्या दुकानात जाऊन बूट शिवले होते, तेव्हापासून रामचेत चर्चेत आला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात अनेकदा रामचेत याचा उल्लेख केला आहे. बैठकीनंतर राहुलने रामचेतला शू शिलाई मशीनही पाठवले होते. त्याचवेळी रामचेतने शूज बनवून राहुल गांधींना पाठवले होते, ज्याचा व्हिडीओ राहुल गांधींनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. यावेळी त्यांनी रामचेत यांच्या कामाचे कौतुकही केले. आता सोमवारी राहुल गांधींनी पुन्हा रामचेतला माल पाठवला आहे.

राहुल गांधींनी शिवलेल्या बुटाची किंमत लाखांत होती पण रामचेतने ते विकण्यास नकार दिला. ते विकणार नसल्याचे सांगितले. राहुल गांधींनी हे साहित्य रामचेतला पाठवले आहे ज्यात चपला, चामड्याचे पत्रे आणि शिवणकामाचे साहित्य आहे. नुकतेच एका कार्यक्रमानिमित्त प्रयागराजमध्ये आलेल्या राहुल गांधींनी रामचेतचे कौतुक केले होते आणि सांगितले होते की त्यांच्याकडे एक कौशल्य आहे जे फार कमी लोकांकडे आहे. त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;