Latur News – जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कारासाठी गाठले कब्रस्तान, तालुक्यातील मरसांगवी येथील घटना

Latur News – जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कारासाठी गाठले कब्रस्तान, तालुक्यातील मरसांगवी येथील घटना

संततधार पावसामुळे जळकोट तालुक्यातील मौजे मरसांगवी येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. कब्रस्तानाकडे जाणारा रस्ताही बंद झाल्याने नाईलाज म्हणून नागरिकांना जीव धोक्यात घालून भर पाण्यातून कब्रस्तान गाठावे लागत आहे.

मरसांगवी-अतनूर रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अतनूर-रावणकोळा-बार्‍हाळी-उदगीर या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती. मरसांगवी येथील ग्रामस्थांनी या पुलाची उंची वाढावी, अशी अनेकवेळा मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मरसांगवी येथील मुस्लिम समाजातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. अतनूर रोडवर असलेल्या कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी पूल ओलांडून जाणे आवश्यक होते. पुलावरून कमरेएवढे पाणी वाहत असल्याने दफनविधी थांबवून ठेवावा लागला. परंतु, पाऊस थांबत नसल्याने शेवटी भर पाण्यातून ट्रॅक्टर कब्रस्तानकडे घेऊन जाण्यात आले. दफनविधी होऊन येईपर्यंत पुलावरील पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना तेथेच पाणी कमी होण्याची वाट बघत बसावे लागले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;