महायुतीकडून आमचा अपमान, तरी आम्ही त्यांच्यासोबत; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत

महायुतीकडून आमचा अपमान, तरी आम्ही त्यांच्यासोबत; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत

महायुतीमध्ये आमचा अपमान होत आहे, तरीही आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच केंद्रात मला जरी मंत्रीपद दिलं असतं तरी महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला महायुतीमध्ये मध्ये विचारात घेतलं जात नाही , पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही अशी खंत आठवले यांनी आज नगर येथे व्यक्त केली.

नगर येथे एका कार्यक्रमानिमित्ताने ते आले असता शासकीय विश्रामगृहावर ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे ,आधी यावेळी उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले की, मला जरी केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मंत्रीपदाची जरी संधी दिली असली तरी दुसरीकडे मात्र आरपीआय पक्षाला महाराष्ट्र मध्ये विचारात घेतले जात नाही, आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाही, शासनाचा जो जो काही कार्यक्रम होतो त्यामध्ये आम्हाला बोलवत नाही. राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल व तुम्हाला मंत्रिपद दिले जाईल असे सांगितले मात्र दोन वर्षे उलटून गेले तरीही अजून विस्तार झाला नाही, एक प्रकारे हा अपमान आहे. आम्हाला अपमान पचवण्याची सवय आहे तरी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत व महायुतीमध्येच राहणार असे वक्तव्य आठवले यांनी केले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जवळचा पक्ष म्हणजेच आरपीआय आहे त्यामुळे आम्हाला राज्यांमध्ये विधानसभेच्या 18 ते 20 जागा मिळाल्या पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला काल आपण स्वतः या ठिकाणी भेट दिली आहे, हवेमुळे तो पडला यावर आपला विश्वास नाही, हवा काही एवढी नव्हती चक्रीवादळ पण नव्हते चुकीच्या माणसाला काम दिल्यामुळे त्याचा आपल्याला हा फटका बसलेला आहे. देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिस्ट आहे की ज्यांना अनुभव आहे त्यांनाच हे काम दिले असते तर अशी वेळ आली नसती पण आता याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला गेला पाहिजे, सरकारने याची चौकशी समिती नेमलेली आहे पण दुसरीकडे आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुतळ्याच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये सत्ताधारी विरोधकांची व तज्ञ लोकांची एक स्वतंत्र कमिटी नेमावी अशी मागणी आपण येत्या एक दोन दिवसांमध्ये करणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

जात निहाय जनगणनाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे पण वास्तविक पाहता 2021 आली जनगणना होणे अपेक्षित होते, पण ती झालेली नाही, जातनिहाय जनगणना व्हावी ही सुद्धा अपेक्षा आहे,एसी ,व एसटी वर्गाची पण त्याचबरोबर करावी असे आठवले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे यांनी लढा उभा केला आहे आमचा त्यांना पाठिंबा आहे पण ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही त्यांची मागणी आम्हाला मान्य नाही असेही आठवले यांनी सांगितले तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाचा विषय घेतला गेला पाहिजे मराठा समाजासाठी एक वेगळी ओबीसी कॅटेगिरी करावी जेणेकरून त्याचा लाभ त्या समाजाला मिळेल याचा विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;