Nanded Rain – पावसाचा जोर वाढला, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nanded Rain –  पावसाचा जोर वाढला, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, जिल्हा प्रशासन याबद्दल सतर्क आहे. नागरिकांनी काळजी घेवून पुराच्या पाण्यात किंवा नाल्यामध्ये जाऊ नये, तसेच पूर आलेल्या भागात सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्वच नदी,नाल्यांना पूर आले असून, आपत्ती व्यवस्थापन व अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आज दुपारी चार वाजता पासदगाव पुलावरुन पाणी जात होते. मात्र प्रशासनातील कर्मचार्‍यांनी वारंवार सांगून सुध्दा एक व्यक्ती प्रशासनाचे काहीच न ऐकता सदरच्या पुलावरुन पुढे गेला तो वाहून गेला.  त्याचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले. गोदावरी नदीकाठावर वसरणी पंचवटीनगर साईबाबा कमान जवळ असलेल्या इमारतीत दुसर्‍या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने तेथील इमारतीत अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जनावरांच्या मृतांची आकडेवारी घेण्याची काम सुरु असून, आतापर्यंत 22 जनावरे यात मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी सांगितले. पासदगाव येथील नांदेड-मालेगाव रोडवर आसना नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कंधार तालुक्यातील बोळगा ते हाडोळती रोडवरील पुलावरुन पाणी जात आहे. कंधारेवाडी येथील पुलावरुन देखील पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जाकापूर ते गोणार हा रस्ता गेल्या 48 तासापासून बंद आहे. अर्धापूर तालुक्यातील मेंढला, शेलगाव व सांगवी या गावाचा अद्यापही संपर्क तुटला असून, त्या भागातील ओढ्याच्या प्रवाहाचे पाणी वाढले असून, प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे. महाटी ता.उमरी येथे पूर आला असून, वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

हस्तरा गावात नदीच्या पुरामध्ये एक व्यक्ती अडकला होता त्याला पुरातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच उंचाडा कयाधू नदीला पूर आल्याने 25 लोक अडकले होते. तहसीलदारांच्या व आपत्ती व्यवस्थापनाच्या टिमने त्यांना सुरक्षितस्थळी बाहेर काढले आहे. सिरजखोड येथील गोदावरी नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने बामणी, येळेगाव थडी, मनूर, संगम या गावचा धर्माबादकडे येणारा रस्ता बंद झाला असून, पर्यायी व्यवस्था म्हणुन हुंनगुंदा ते कुंडलवाडी मार्ग सुरु आहे. राहेगाव ते किक्की या दोन गावामधील पुलावरुन पाणी जात असल्याने लोकांना जाता येत नाही. पुलावरुन पाणी कमी होईपर्यंत कुणीही या पाण्यामधून जावू नये अशा सुचना प्रशासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले. पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन पूर्णतः लक्ष ठेवून असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;