‘या’ अभिनेत्रीने आयटम साँगसाठी घेतले होते 5 कोटी, बॉलीवूडमध्ये काम न करता उत्पन्न पाहून व्हाल थक्क

‘या’ अभिनेत्रीने आयटम साँगसाठी घेतले होते 5 कोटी, बॉलीवूडमध्ये काम न करता उत्पन्न पाहून व्हाल थक्क

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या वेबसीरीज ‘सिटाडेल हनी बनी’ मुळे चर्चेत आली आहे. या वेब वेबसीरीजमध्ये ती अभिनेता वरुण धवनसोबत दिसणार आहे. समांथा साऊथ इंडस्ट्रीतील मोठी अभिनेत्री असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे. तिच्या सिनेमांसाठी ती तगडी फी घेते. तर समांथाने एका आयटम साँगसाठी 5 कोटी रुपये फी घेतले.

सामंथा आयटम साँगसाठी साधारण 1 ते 2 कोटी रुपये घेते. मात्र वृत्तानुसार, समांथाने एका आयटम साँगसाठी 5 कोटी रुपये फी घेतली आहे.  ‘पुष्पा’ या सिनेमातील ‘ओ अंटावा’ या आयटम साँगसाठी तिने 5 कोटी रुपये घेतले. हे गाणे रिलीज होताच तुफान व्हायरल झाले आणि सगळीकडे समांथाची चर्चा झाली. ‘पुष्पा’ सिनेमात रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत होती. मात्र समांथाने रश्मिकाहून जास्त फी घेतली होती. Stockgro’s 2023 च्या वृत्तानुसार, समांथाची नेटवर्थ 101 कोटी रुपये आहे. ती तिच्या सिनेमाचा 3 ते 5 कोटी फी घेते. याशिवाय एंडोर्समेण्ट या ब्रॅण्डचे वर्षाला 8 कोटी रुपये कमावते.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

समांथा लक्झरी लाइफस्टाइम मेण्टेन करते. ती 7.8 कोटी च्या अपार्टमेण्टमध्ये राहते. तिला गाड्यांचा शॉक आहे. तिच्याकडे ऑडी Q7, Porsche Cayman GTS, लैंड रोवर, मर्सिडीज बेंज G63 AMG, BMW 7 सीरीज, जगुआर एक्सएफ सारख्या गाड्या आहेत. तिने आतापर्यंत कोणत्याही बॉलीवूड सिनेमात काम केलेले नाही. ती तामिळ-तेलगू सिनेमात दिसते. तिने आता ओटीटीवर पदार्पण केले आहे. ती हिंदी वेब सिरीजच्या ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये दिसली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;