आयटम सॉन्गसाठी 5 कोटी मानधन घेणारी अभिनेत्री गडगंज श्रीमंत, नेटवर्थ जाणून व्हाल हैराण

आयटम सॉन्गसाठी 5 कोटी मानधन घेणारी अभिनेत्री गडगंज श्रीमंत, नेटवर्थ जाणून व्हाल हैराण

झगमगत्या विश्वात अशा असंख्य अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक संघर्षाचा सामना करत इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंडस्ट्रीमध्ये काम करत अभिनेत्रींनी फक्त प्रसिद्धी नाही तर, संपत्ती देखील मिळवली आहे. झगमगत्या विश्वातील काही अभिनेत्री आता कोट्यवधी रुपये कमावतात. अभिनेत्रींची नेटवर्थ जाणून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आहे. अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर समंथा हिने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

समंथा एका सिनेमासाठी तगडं मानधन घेते. तर अभिनेत्री एका आयटम सॉन्गसाठी 5 कोटी रुपये मानधन घेते. रिपोर्टनुसार, इतर अभिनेत्री आयटम सॉन्गसाठी जवळपास 1 – 2 कोटी रुपये मानधन घेतात. पण समंथा हिने एका आयटम सॉन्गसाठी 5 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. ‘पुष्पा’ सिनेमातील Oo Antava गाण्यात दमदार डान्स करत समंताने सर्वांना चकित केलं होतं.

पुष्पा सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होता. पण रश्मिका हिच्यापेक्षा अधिक मानधन समंथा हिने एका आयटम सॉन्गसाठी घेतलं होतं. रश्मिकाने सिनेमासाठी 2 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होते. आता सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.

रिपोर्टनुसार, समंथा हिचे नेटवर्थ 101 कोटी रुपये आहे. एका सिनेमासाठी अभिनेत्री 3 -5 कोटी रुपये मानधन घेते. शिवाय अभिनेत्री जाहिरातींसाठी 8 कोटी रुपये मानधन घेते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री बक्कळ पैसे कमावते.

रॉयल आयुष्य जगतेय समंथा…

समंथा रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्री 7.8 कोटी रुपयांच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. समंथा हिला महागड्या गाड्यांचा देखील शोक आहे. समंथा हिच्या गॅरेजमध्ये Audi Q7, Porsche Cayman GTS, Land Rover, Mercedes Benz G63 AMG, BMW 7 Series, Jaguar XF यांसारख्या कार आहेत.

समंथा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर समंथाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;