जया बच्चन यांच्यावर साधला कंगना रणौतने निशाणा; म्हणाल्या, ‘काही महिला चुकीच्या दिशेने…’

जया बच्चन यांच्यावर साधला कंगना रणौतने निशाणा; म्हणाल्या, ‘काही महिला चुकीच्या दिशेने…’

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर स्वतःची ठाम भूमिका मांडत कंगना वादाच्या भोवऱ्यात असतात. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कंगना यांनी राजकारणात प्रवेश केला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन – कंगना रणौत यांची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी जया बच्चन यांना स्त्रीवादबद्दल सुनालं आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जया बच्चन अध्यक्षांवर रागावताना दिसत होत्या. या नाराजीचे कारण म्हणजे अध्यक्षांनी जया बच्चन यांना पती अमिताभ यांच्या नावाने हाक मारली होती.

पतीच्या नावाने हाक मारल्यानंतर जया बच्चन प्रचंड रागावल्या होत्या. महिलांना स्वतःची ओळख नाही का? असा प्रश्न जया बच्चन यांनी उपस्थित केला. पण त्यानंतर जया यांनी स्वतःचे शब्द देखील मागे घेतले. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जया बच्चन यांनी ‘मला माझ्या पतीवर आणि त्यांच्या कतृत्वावर गर्व आहे..’ असं म्हणाल्या होत्या.

यावर कंगना यांना विचारण्यात आलं. कंगना म्हणाल्या, ‘ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे. निसर्गाने महिला आणि पुरुषांना वेगळं बनवलं आहे. दोघांमध्ये देखील अंतर आहे. पण सध्याच्या घडीच्या स्त्रीवादाच्या नावाखाली काही महिला चुकीच्या मार्गाने जात आहेत. आपला समाज आता उद्धटपणाच्या दिशेने जात आहे. लोकांना वाटतं माझी ओळख मागे राहात आहे. त्यांना पॅनिक अटॅक येऊ लागतो. लोकं आता इतके घाबरले आहेत… ही प्रचंड चुकीची गोष्ट आहे.’ असं देखील कंगना रणौत म्हणाले.

कंगना रणौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणार प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

फक्त राजकारणावरच नाही तर, कंगना रणौत बॉलिवूड सेलिब्रिटींवर देखील निशाणा साधत असतात. कंगना यांनी अनेकदा दिग्दर्शक करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय कंगना बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीबद्दल देखील बोलत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;