कंगना रणौतकडून लग्नाबद्दल मोठा खुलासा, ‘सासू – सासरे पळून गेले इतकं बदनाम…’

कंगना रणौतकडून लग्नाबद्दल मोठा खुलासा, ‘सासू – सासरे पळून गेले इतकं बदनाम…’

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत स्टारर Emergency सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री अनेक मोठ्या आणि धक्कादायक गोष्टींचा खुलासा करत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी स्वतःच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. होणारे सासू – सासरे घरी बसलेले असताना अशी काही परिस्थिती समोर आली, ज्यामुळे कंगना यांचे लग्न मोडलं.

नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना रणौत यांना खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘कोणत्या राजकारणी व्यक्तीसोबत लग्न करणार की कोणत्या अभिनेत्यासोबत?’ यावर कंगना यांनी मोठी खुलासा केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

प्रश्नाचं उत्तर देत कंगना म्हणाल्या, ‘आया याबद्दल मी काय सांगू… लग्नाबद्दल माझ्या मनात चांगले विचार आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक जोडीदार असावा… स्वतःचं छोटं कुटुंब असावं… असं मला देखील वाटतं. पण आता लोकांनी मला बदनाम करून ठेवलं आहे. माझं लग्न होऊ देत नाहीत…’

‘कोर्टात माझ्या विरोधात इतक्या केस सुरु आहे. कोणासोबत लग्नाची बोलणी सुरु असेल तर माझ्या घरी पोलीस येतात. मला सतत समन्स येत असतात…’ असं सांगत कंगना रनौत हिने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांची चर्चा रंगली आहे.

कंगना रनौत म्हणाल्या, ‘एकदा तर माझे होणारे सासू – सासरे माझ्या घरी आले होते आणि समन्स आला. त्याक्षणी पाहुणे माझ्या घरातून पळून गेले… यामुळे देखील माझं लग्न होत नाहीये… माझं बोलणं खोटं वाटेल पण हे सत्य आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केल्यानंतर कंगना यांनी राजकारणाकडे मोर्चा वळवला आहे.

कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणात प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;