Chandrapur बळीराजावर पूराचं संकट; मिरचीचे पिक पाण्याखाली, पुरात शिरून झाडे काढण्यासाठी धडपड
शेतकऱ्यांच्या अतिशय आनंदाचा आणि जिव्हाळाच्या सण म्हणजे पोळा. या सणाच्या आनंदावर नदीला आलेल्या पुराने विरजण टाकले. पूर शेतात शिरल्याने पिके पाण्याखाली आली आहेत. मिरचीचे पीक पुरातून वाचवण्यासाठी बळीराजा धडपडत आहे. बालाजी चौधरी असे शेतकऱ्याचे नाव आहे ते गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील असून 4 एकर मध्ये त्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती. वर्धा नदीला पूर आल्याने या पुरात शेत पाण्याखाली आले. मिरचीचे पीक वाचवण्यासाठी त्यांचा कुटुंबीयांनी पुराच्या पाण्यातून मिरचीचे रोपे उपडून बाहेर काढीत आहेत.
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. पूर लवकर ओसरला नाही तर पिके कुजून जाण्याच्या धोका वाढला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List