Jayakwadi dam alert: जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार! छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Jayakwadi dam alert: जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार! छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

>> बद्रीनाथ खंडागळे, पैठण

नाशिक व नगर भागातील सर्व ९ धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यातच नाथसागर जलाशयात ३४ हजार ३१८ क्युसेक्सप्रमाणे पाण्याचा जलौघ येतच असून प्रकल्प तुडुंब भरण्यासाठी केवळ १२ टक्के पाण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नदिकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. असे आवाहन करणारे पत्र कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नगर व नांदेड या ५ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

१५२२ फुट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात आज सकाळी १५२० पाणीपातळीची नोंद झाली. प्रकल्प पुर्णक्षमतेने भरण्यासाठी आता केवळ २ फुट पाणीपातळीची गरज आहे. त्यातच वरच्या भागातील सर्व ९ छोटीमोठी धरणे तुडुंब भरली असून सध्या जायकवाडीत ३४ हजार ३१८ क्युसेक्स याप्रमाणे नवीन पाण्याची आवक चालू आहे. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढणार आहे.

या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दि. १ सप्टेंबर रोजी रात्रीच वरील ५ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. यात म्हटले आहे की, “पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणाकडे येणारी आवक विचारात घेऊन यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणामधुन गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. तसेच जायकवाडी धरणाच्या निम्न बाजुचे आपेगाव, हिरडपुरी, जोगलादेवी, मंगरुळ, राजाटाकळी, लोणी व सावंगी या गोदावरीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांचे दरवाचेसुद्धा कोणत्याही उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे खबरदारी म्हणून जायकवाडी धरण व गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांच्या निम्न बाजुच्या गोदावरी किनाऱ्या लगतच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. पशुधन, रस्ते, पुल व वास्तु यांची खबरदारी घेणेबाबत सर्व संबंधीतांना निर्देश व्हावेत.” अशी विनंतीही या पत्रात केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;