Nagpur: भूतबाधेच्या नावावर आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार; भोंदूबाबाला शिक्षा

Nagpur: भूतबाधेच्या नावावर आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार; भोंदूबाबाला शिक्षा

मिंधे सरकारच्या राज्यात महिला, मुली अजिबातच सुरक्षित नसल्याचे वारंवार उघड होत आहे. महिलांवरील अत्याचाराची मालिका सुरूच असून युवतीला भूतबाधा झाल्याचे सांगून गुंगीचे औषध देऊन तिच्यासह कुटुंबातील चार महिलांवर एका भोंदूबाबाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या भोंदूबाबाला न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

मुलीला भूतबाधा झाली असून तिच्यासाठी 21 दिवस धार्मिक पूजा करावी लागेल. तसेच या तरुणीमुळे अन्य महिलांनाही भूतबाधा झाल्याची बतावणी करून धर्मेंद्र विठोबा निनावे ऊर्फ दुलेवाले बाबा (5) या भोंदूबाबाने आई, मुलगी, मामी आणि 60 वर्षीय आजीवर बलात्कार केला. तसेच तंत्र-मंत्राने उपचार करण्याच्या बहाण्याने कुटुंबातील तरुणीचे लैंगिक शोषण भोंदूबाबा करत होता. त्याने जवळपास अडीच वर्षांपर्यंत त्या कुटुंबातील महिलांचे शोषण केले. अखेर त्याचे बिंग फुटले आणि त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कारवाई

पारडी पोलिसांनी 17 वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दुलेवाले बाबाविरुद्ध गुन्हा नोंदवला. पीडितेच्या वडिलांची दुलेवाले बाबाशी ओळख होती. पीडिता नेहमी आजारी राहत असल्याने कुटुंबीय चिंतीत होते. बाबाने मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगितले. पूजा करण्याच्या बहाण्याने दुलेवाले बाबाने आई, मुलगी, मामी आणि आजीला भूतबाधा झाल्याचे सांगून त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. या महिला शुद्धीवर येताच महिलांना वेगवेगळय़ा कारणाने कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत होता. अखेर पीडित 17 वर्षीय तरुणीने आई, मामी, आजीला विश्वासात घेऊन बाबाविरोधात तक्रार नोंदवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;