घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकचा व्हिडीओ व्हायरल; सत्य मात्र काहीतरी वेगळंच!

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकचा व्हिडीओ व्हायरल; सत्य मात्र काहीतरी वेगळंच!

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत आहेत. हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या हे कुठेच सोबत दिसत नसल्यामुळेही या चर्चांना उधाण आलंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नालाही ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत आली होती. तर अभिषेक त्याच्या आईवडिलांसोबत पोहोचला होता. बच्चन कुटुंबीयांसोबत त्यांची सून न दिसल्याने घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. या चर्चांदरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सर्वकाही ठीक असून दोघं मुलीसोबत व्हेकेशनवर जात असल्याचं म्हटलं गेलंय.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या हे मुलगी आराध्यासोबत दुबई एअरपोर्टवर दिसले. त्याचाच व्हिडीओ एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लिहिलंय, ‘दुबई एअरपोर्ट’. घटस्फोटाच्या चर्चा या केवळ अफवा असून दोघं अजूनही सोबत असल्याचं म्हटलं जातंय. अभिषेक-ऐश्वर्याचा हा व्हिडीओ आताचा असल्याचं सांगून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मात्र या व्हिडीओचं सत्य काही वेगळंच आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा हा व्हिडीओ आताचा नाही. सोशल मीडियावर थोडंफार सर्च केल्यानंतर असं समजतंय की हा व्हिडीओ फेब्रुवारी महिन्यातील आहे.

पहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो एका एअरपोर्टवरील आहे. विमानातून उतरल्यानंतर अभिषेक बसच्या दिशेने चालू लागतो. त्याच्या मागे पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्यासुद्धा आहे. व्हिडीओमध्ये एअरपोर्टचा स्टाफसुद्धा दिसून येत आहे. खांद्यावर बॅग घेऊन अभिषेक इकडे तिकडे न बघता थेट एअरपोर्टच्या बसमध्ये चढताना दिसतोय. तर ऐश्वर्या आणि आराध्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट लाईक केली होती. ही पोस्ट घटस्फोटाशी संबंधित होती. एका पत्रकाराने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधिची पोस्ट शेअर केली होती. त्यात ‘इंडियन इक्स्प्रेस’च्या ‘आय मॅगझिन’मधील लेख होता. ‘जेव्हा प्रेम सोपं होणं थांबतं,’ असं त्या पोस्टवर लिहिलेलं होतं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये घटस्फोटाविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. हीच पोस्ट अभिषेकने लाईक केल्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;