वादग्रस्त विधाने थांबली नाहीत तर कार्यकर्त्यांना आवरता येणार नाही; अजित पवारांचा थेट शिंदे-फडणवीसांना इशारा
भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गटातील अंतर्गत वाद आणखी उफाळून आला असून वादग्रस्त वक्तव्ये थांबली नाहीत तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचे जाईल, असा इशारा अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत तसेच गणेश हाके यांच्या अजित पवार गटाच्या विरोधातील वादग्रस्त विधानांमुळे अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आज नागपूरच्या रामगिरी येथे महायुतीची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी दोन्ही नेत्यांना पुन्हा इशारा दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List