अल्पवयीन मुलीवर सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती

अल्पवयीन मुलीवर सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये देशाला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. सरकारी शाळेतील शिपायाने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. सदर प्रकार पीडिता पाच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर उघड झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री शौचास गेली असता आरोपी पंकज आणि अमित यांनी तिला पकडले आणि एका बंद खोलीमध्ये घेऊन गेले. त्यानंतर अमितने पीडितेवर बलात्कार केला तर पंकज घराबाहेर उभा होता. तसेच आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने कुटुबियांना याबद्दल सांगितले नाही. मात्र पीडित मुलगी जेव्हा पाच महिन्यांची गर्भवती राहिली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या कुटुंबियांनी तत्काळ आरोपी पंकज आणि अमित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि पोक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत FIR दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;