KBC 16: केबीसीमध्ये या मुलीने अमिताभ बच्चनकडे केली अशी मागणी की बिग बी लाजले, पुढे काय झाले?

KBC 16: केबीसीमध्ये या मुलीने अमिताभ बच्चनकडे केली अशी मागणी की बिग बी लाजले, पुढे काय झाले?

‘कौन बनेगा करोड़पति 16’ सुरु झाले आहे. बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा या शोच्या माध्यामातून समोर आले आहे. या शोमध्ये उत्तर प्रदेशातील बलिया येथील अलका सिंह आली. तिच्यासोबत झालेला संवाद इस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या शोमध्ये अलका सिंह हिने अशी मागणी केली की अमिताभ बच्चन लाजले. त्यानंतर शो संपल्यावर आपण जेव्हा फोटो काढू तेव्हा तुमची मागणी पूर्ण करु, असे अमिताभ बच्चन यांनी अलका सिंह हिला सांगितले. अलका सिंह हिने अमिताभ बच्चनकडे त्यांच्या दाढीला हात लावण्याची मागणी केली होती. ती मागणी ऐकताच अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला.

अलका सिंह पोस्ट मास्टर

अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये भावूक झालेल्या अलका सिंह यांना डोळे पुसण्यासाठी टिश्यू पेपर दिले. त्यानंतर अलका म्हणते मी इतकी रडली नाही, तुम्ही टिश्यू पेपर वेस्ट केला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सॉरी म्हणताच अलका सिंह पुन्हा ‘गुड बॉय’ म्हणत उत्तर देते. त्यामुळे शोमध्ये हंसा पिकतो. 82 वर्षांचा अमिताभ बच्चन यांच्यासमोर 24 वर्षीय अलका सिंह शोमध्ये आहे. अलका सिंह भारतीय डाक घरात पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत आहे.

अलकाने केली अशी मागणी की…

अलकाने अमिताभ बच्चन यांच्याकडे आगळी वेगळी मागणी केली. तिने अमिताभ बच्चन यांना म्हटले की, मी तुमच्या दाढीला हात लावू शकते का? त्यानंतर बिग बी विचारले की तू तुझ्या भावाच्या किंवा वडिलांच्या दाढीला का स्पर्श करत नाही. तेव्हा ती उत्तर देते, ‘माझ्या भाऊ क्लीन सेव्ह ठेवतो. माझे वडीलही दाढी ठेवत नाहीत. त्यानंतर बिग बींनी गंमतीने उत्तर दिले, ‘जेव्हा तुझा भाऊ 82 वर्षांचा होईल, तेव्हा त्याची दाढीही पांढरी होईल. मग तू त्याला स्पर्श करू शकते. त्यानंतर शो संपल्यावर माझ्या दाढीला स्पर्श करू शकते, असे अमिताभ यांनी अलका म्हटले. पुन्हा अलका म्हणजे तुम्ही बहाणे करत आहात. तेव्हा अमिताभ म्हणतात, आपण शो संपल्यावर फोटो काढू तेव्हा दाढीला स्पर्श कर.

तो किस्सा सांगितले…

अलका अमिताभ बच्चन यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. अलका म्हणजे, बोर्डाच्या परीक्षेची वेळ आली तेव्हा माझे वय कमी होते. त्यामुळे पालकांना तिचे वय वाढवले. त्यामुळे आज मी प्रत्यक्षात 22 वर्षांची आहे, परंतु कागदावर 24 वर्षांची आहे. तेव्हा अमिताभ बच्चन यांना विचारले की तिला हा प्रकार आवडला की नाही. तेव्हा तिने आवडला नसल्याचे सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;