“अरबाजच्या मृत्यूचा इतका खेद वाटला नसता”; असं का म्हणाले सलीम खान?
कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिग्गज पटकथालेखक सलीम खान त्यांच्या तीन मुलांसोबत पोहोचले होते. सलमान, अरबाज आणि सोहैल खान यांच्यासोबत ते या शोमध्ये उपस्थित राहिले होते. या एपिसोडमध्ये सलीम खान यांनी 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटाविषयी मत मांडलं होतं.
सोहैल खानने हा चित्रपट बनवला होता आणि त्यात अरबाज, सलमान या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. जेव्हा सोहैलने वडील सलीम खान यांना तो चित्रपट दाखवला, तेव्हा त्यांनी एक सल्ला दिला होता. याविषयी त्यांनी 'कपिल शर्मा'च्या शोमध्ये सांगितलं होतं.
सलीम खान यांनी म्हटलं होतं की चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की त्यात भूमिकांची अदलाबदल करणं गरजेचं होतं. "या चित्रपटात मध्यांतराच्या आधीच सलमानच्या भूमिकेचा मृत्यू होतो. ही भूमिका खरंतर अरबाजने साकारायला पाहिजे होती."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List