शाहरुख खान याने काढला हनी सिंहच्या कानाखाली जाळ?, अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला…
हनी सिंह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हनी सिंह याने धमाकेदार पद्धतीने पुनरागमन केले. यावेळी आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्याबद्दलही बोलताना हनी सिंह हा दिसला. आता नुकताच हनी सिंह याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये बरेच मोठे खुलासे करताना हनी सिंह दिसला. पहिल्यांदाच त्याने भारत सोडून इतर देशात राहण्याचे खरे कारणही सांगितले. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यानेच आपण भारतात राहत नसल्याचे हनी सिंह याच्याकडून सांगण्यात आले.
मध्यंतरी एक चर्चा जोरदार रंगताना दिसली की, शाहरुख खान याने थेट हनी सिंह याच्या कानाखाली मारली. मात्र, त्यावेळी यावर शाहरुख खान किंवा हनी सिंह यांनी भाष्य केले नाही. आता पहिल्यांदाच त्यावर बोलताना हनी सिंह हा दिसला. हेच नाही तर त्यावेळी नेमके काय घडले हे सांगताना देखील हनी सिंह हा दिसतोय.
हनी सिंह म्हणाला की, शाहरुख खानला माझे चार बोतल वोडका आणि लुंगी डान्स हे गाणे आवडले नव्हते. त्यावेळी माझे गाणे हीट होत होते. मी त्यावेळी अनेक मोठ्या लोकांना गाण्यासाठी नकार दिला होता. लुंगी डान्स गाण्याला शाहरुख खानने नकार दिला आणि थेट माझ्या गाण्याला त्यांनी बकवास म्हटले.
शाहरुख खानने माझ्या गाण्याला बकवास म्हटल्यानंतर मी रागात आलो आणि म्हटले की, मी सिंगल बनवेल. त्यानंतर शाहरुखने म्हटले की, हे गाणे आपण चेन्नई एक्सप्रेसमध्ये घेऊ. शाहरुख खानने माझ्या कानाखाली मारले वगैरे नसल्याचे देखील हनी सिंह याने म्हटले. त्यावेळी असे सांगितले गेले होते की, शाहरुख खान आणि हनी सिंह याच्यावर भांडणे झाली आणि शाहरुखने हनीच्या कानाखाली दिली.
हनी सिंह याचे गाणे कायमच धमाका करताना दिसतात. हनी सिंहचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. हनी सिंह भारतामध्ये फार कमी वेळ घालवतो. दुबई हे आपल्याला जास्त सुरक्षित वाटत असल्याचे देखील हनी सिंह याने म्हटले. पोलिसांकडून हनी सिंह याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List