सर्वोच्च न्यायालयाकडून भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.
सर्वोच्च न्यायालयाकडून ही भरती प्रक्रिया कनिष्ठ न्यायालय परिचर पदासाठी सुरू आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी ही 12 सप्टेंबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
sci.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावी लागतील आणि तिथेच तुम्हाला भरतीची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
यासोबतच उमेदवाराचा स्वयंपाक किंवा पाककला या विषयात किमान एक वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणेही आवश्यक आहे. 18 ते 27 वर्ष वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
लेखी परीक्षेपासून प्रात्यक्षिक चाचणी आणि मुलाखत उमेदवारांना द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 400 रूपये फीस ही द्यावी लागणार आहे. आरक्षित श्रेणीसाठी शुल्क 200 रुपये आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही उमेदवाराने व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List