टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय..; डीपी दादाच्या गुलाबी जॅकेटवरून रितेशची फटकेबाजी

टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय..; डीपी दादाच्या गुलाबी जॅकेटवरून रितेशची फटकेबाजी

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. यंदाच्या सिझनमध्येही दोन गट पडले असून या दोन्ही गटांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत रंगतेय. त्यातच अभिनेता रितेश देशमुखचं ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमधील सूत्रसंचालन चाहत्यांना खूपच आवडतंय. नुकत्याच पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये रितेशने काही स्पर्धकांची शाळा घेतली तर काहींचं कौतुक केलं. मात्र या एपिसोडमधील रितेशच्या एका खास कमेंटने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. ही कमेंट त्याने धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादाच्या कपड्यांवरून केली होती. ‘भाऊचा धक्का’ एपिसोडसाठी धनंजयने खास गुलाबी रंगाचा जॅकेट घातला होता. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून गुलाबी जॅकेटमुळे चर्चेत आहेत. त्यावरून रितेशने केलेली ही कमेंट विशेष लक्षवेधी ठरतेय.

‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये रितेश धनंजयला म्हणतो, “धनंजय तुमचं जॅकेट फार छान आहे. टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय. कारण ही तिकडची स्टाइल आहे. कोल्हापूरपर्यंत आली आहे, असं कळतंय. छान दिसतंय” हे ऐकताच धनंजयसह घरातील इतर स्पर्धक हसू लागतात. ‘बारामतीचा टेलर’ या रितेशच्या कमेंटचं कनेक्शन अजित पवारांशी जोडलं जातंय. ‘लाडकी बहीण योजने’ची घोषणा केल्यापासून अजित पवार सतत गुलाबी जॅकेटमध्येच दिसून येत आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली होती.

“मी माझ्या पैशाने पिंक जॅकेट घातलं. मी काय घालायचं हा माझा प्रश्न आहे. मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी ब्रँडिंग प्रमोशन असलं काही करत नाही. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटतं तेच करतो,” असं अजितदादा म्हणाले होते. अशातच त्यांनी 18 गुलाबी रंगाचे जॅकेट्स विकत घेतल्याचीही चर्चा होती. एवढंच नव्हे तर पक्षातील आमदार, खासदार, मंत्री आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण स्तरावरील कार्यकर्त्यांना गुलाबी रंगाचा वापर करण्याच्या सूचना अजितदादा गटाने दिल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादांनी स्वत: सरकारी आणि पक्षांच्या बैठकांमध्ये गुलाबी रंगाचे जॅकेट घालण्यास सुरुवात केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कोल्हापुरी गडी आणि लोकप्रिय रील स्टार धनंजय पोवारने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. एक साधा उद्योजक ते रील स्टार असा प्रवास करणारा धनंजय आता ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावरून चाहत्यांचं मनोरंजन करतोय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;