कपूर घराण्याच्या सूनांना सक्तीने सोडावं लागलं करिअर? करिश्माने सांगितलं सत्य

कपूर घराण्याच्या सूनांना सक्तीने सोडावं लागलं करिअर? करिश्माने सांगितलं सत्य

कॉमेडियन झाकीर खानच्या ‘आपका अपना झाकीर’ या शोमध्ये ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या चौथ्या सिझनमधील परीक्षक पाहुणे म्हणून पोहोचले होते. अभिनेत्री करिश्मा कपूर, कोरिओग्राफर गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या तिन्ही सेलिब्रिटींसोबतचा हा एपिसोड अत्यंत धमाल आणि विनोदांनी भरलेला होता. या एपिसोडमध्ये झाकीरने करिश्माला अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता. “कपूर घराण्यातील महिलांवर काम करण्याबाबत काही बंधनं होती का”, असा सवाल त्याने करिश्माला विचारला. त्यावर करिश्माने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

“मला अभिनय क्षेत्रात परवानगी होती की नाही या सर्वांची अनेकदा चर्चा झाली. जेव्हा माझ्या आईचं लग्न झालं, नीता काकींचं लग्न झालं, तेव्हा त्यांनी हा पर्याय निवडला की त्यांना घराकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे. करिअरमध्ये बऱ्यापैकी काम केल्यानंतर त्यांनी मुलंबाळं, घर यांचा विचार केला. ही पूर्णपणे त्यांची निवड होती. त्याचप्रमाणे शम्मी काका आणि शशी काकांच्या ज्या पत्नी होत्या, गीता बालीजी आणि जेनिफर काकी.. यांनी लग्नानंतरही काम केलंय. त्यामुळे कपूर घराण्यात लग्नानंतर महिलांना काम करण्याची परवानगी नाही, या चर्चा खोट्या आहेत. असं काहीच नव्हतं”, असं करिश्मा म्हणाली.

करिश्मा पुढे असंही म्हणाली की तिला अभिनयात काम करण्याची आवड होती म्हणून तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं. बहीण करीना आणि भाऊ रणबीर कपूर यांच्याही बाबतीत तेच होतं. त्या दोघांनाही अभिनयाची आवड होती. पण रणबीरची बहीण रिद्धिमाला अभिनयात फारसा रस नव्हता. म्हणून तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं नाही, असं करिश्माने सांगितलं. “माझ्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीने मला काम करण्यापासून रोखलं नाही”, असं करिश्माने स्पष्ट केलं.

करिश्मा कपूरने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. करिश्माने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला असून त्यावेळी ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारही पटकावले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;