‘बिग बॉस मराठी 5’च्या सदस्यांना बसणार जबरदस्त शॉक; वर्षा उसगांवकरांचा एकच कल्ला
'बिग बॉस मराठी 5'चा खेळ अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. 'भाऊचा धक्क्या'वर आज सदस्यांना जबरदस्त शॉक बसणार आहे. माणसं ओळखायला चुकल्याने सदस्यांना हा शॉक बसणार आहे.
रितेश सदस्यांना प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर त्या सदस्याला शॉक दिला जातो. 'भाऊचा धक्क्या'वर रितेश हा अंकिता आणि वर्षा उसगांवकरांना प्रश्न विचारतो.
वर्षाताई सध्या घरात कोणत्या सदस्याबद्दल जास्त बोलतात," असा प्रश्न रितेश विचारतो. अंकिता आणि वर्षाताईंचं उत्तर जर एकच आलं नाही तर त्यांना शॉक देण्यात येतो.
वर्षा ताईंनी निक्कीचं नाव लिहिलेलं असतं तर अंकिताने डीपी दादाचं नाव लिहिलेलं असतं. उत्तर चुकल्यामुळे वर्षा ताई अंकितावर चिडतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List