रणबीरला ‘सिरीयल स्कर्ट चेझर’ म्हटल्यानंतर आता कंगना यांचं वक्तव्य चर्चेत

रणबीरला ‘सिरीयल स्कर्ट चेझर’ म्हटल्यानंतर आता कंगना यांचं वक्तव्य चर्चेत

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी एका मुलाखतीत अभिनेता रणबीर कपूरवर टीका केली होती. 2020 मध्ये दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी रणबीरला थेट ‘सिरीयल स्कर्ट चेझर’ असं म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. कंगना आणि रणबीर यांनी एकत्र कधीच काम केलं नाही. मात्र इंडस्ट्रीतील घराणेशाहीवरून टीका करताना कंगना यांनी अनेकदा रणबीरवर निशाणा साधला आहे.

कंगना यांनी नुकतीच ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यात पत्रकार रजत शर्मा हे कंगना यांना त्यांच्या जुन्या वक्तव्यावरून प्रश्न विचारताना दिसत आहेत. “रणबीरला तुम्ही सिरीयल स्कर्ट चेझर असं म्हटलं होतं. त्यावर काय प्रतिक्रिया द्याल”, असं त्यांना विचारलं होतं. हे ऐकून कंगना जोरात हसू लागतात आणि म्हणतात, “तुम्ही तर असं बोलताय जसं की तो स्वामी विवेकानंद असेल.”

2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा मुद्दा खूप चर्चेत होता. यावरून कंगना राणौत यांनी बरीच टीका केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये केलेल्या ट्विटमध्ये कंगना यांनी लिहिलं होतं की, ‘फक्त इंडस्ट्रीबाहेरून, छोट्या आणि विनम्र कुटुंबातून येणाऱ्या कलाकारांवरच ही हिंदी इंडस्ट्री टीका करते. रणबीर कपूर तर ‘सिरीयल स्कर्ट चेझर’ आहे पण त्याला बलात्कारी म्हणण्याची हिंमत कोणातच नाही. दीपिका तर स्वयंघोषित मानसिक आजाराची रुग्ण आहे, पण कोणीच तिला सायको म्हणत नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

‘आप की अदालत’च्या या प्रोमोमध्ये कंगना यांना निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबतच्या वादावरूनही प्रश्न विचारण्यात आला. “करणला तू चाचा चौधरी असं म्हटलं होतंस”, असं पत्रकार कंगना यांना विचारतात. त्यावर कंगना म्हणतात, “मी कधीच स्वत:हून आधी त्यांच्यावर निशाणा साधला नाही. मी माझं काम करत राहिले असते जर मला त्यांनी टीका करण्यास उत्तेजित केलं नसतं. त्यांनीच मुद्दा दिला, म्हणून मी सुद्धा गप्प राहिले नाही.”

याआधी आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कंगना यांनी खुलासा केला होता की रणबीरने त्याच्या ‘संजू’ या चित्रपटातील एका भूमिकेची ऑफर त्यांना दिली होती. “रणबीर स्वत:हून माझ्या घरी आला आणि म्हणाला की संजू या चित्रपटात काम कर प्लीज. पण मीच त्याला नकार दिला”, असं कंगना यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;