सुजाता सौनिक दलित महिला म्हणून नकोशा झाल्या का? ‘बहुजन संग्राम’ चा सवाल

सुजाता सौनिक दलित महिला म्हणून नकोशा झाल्या का? ‘बहुजन संग्राम’ चा सवाल

राज्याच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून दोनच महिन्यांतच महाराष्ट्र सरकारला त्या नकोशा झाल्या आहेत काय? असा सवाल बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी केला.

सुजाता सैनिक या पंजाबमधील दलित समाजातील आहेत. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात दलित विद्यार्थ्यांची तुकडी पाठवली होती, त्यातील सी. डी. चिमा यांच्या घराण्यातील सुजाता सौनिक आहेत, याची त्यांनी एका पत्रकाद्वारे आठवण करून दिली आहे. सौनिक यांना हटविण्याच्या हालचालींमुळे शिंदे-फडणवीस-अजितदादा यांच्या सरकारचा दलितद्वेष्टा जातीयवादी चेहरा उघडा पडला आहे, असे चिलगावकर यांनी म्हटले आहे.

शिंदे सरकार सध्या ‘ लाडकी बहिण ‘ असे संबोधत महिला वर्गाचे सध्या लांगूलचालन करत आहे. त्यामागे विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे निव्वळ राजकारण आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारचा महीलांबद्दलचा कळवळा नकली आहे, हेच सुजाता सौनिक यांना हटविण्याच्या हालचाली सांगत आहेत, असा आरोप चिलगावकर यांनी केला आहे.

गृह खात्यातील विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव आय.एस. चहल यांची मुख्य सचिव पदी वर्णी लावण्यासाठीच शिंदे सरकारने सुजाता सौनिक यांना हटवण्याचे पाऊल उचलले आहे. त्यांचा कार्यकाल पुढील वर्षी जूनमध्ये संपणार आहे. त्यापूर्वी सौनिक यांना हटवण्यात आल्यास शिंदे सरकारला दलितांच्या रोषाला आणि उग्र प्रतिक्रियेला तोंड द्यावे लागेल, असा इशारा बहुजन संग्रामच्या पत्रकाच्या शेवटी चिलगावकर यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;