कास पठार परिसरात वन्यप्राण्यांची दहशत, गव्याची युवतीच्या दुचाकीला धडक
कास परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना अधूनमधून घडत असताना, तीन दिवसांपूर्वी युवतीच्या दुचाकीला गव्याने धडक देत तिला खाली पाडून जखमी केल्याचा प्रकार घडला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
ऋतिका अशोक बादापुरे (कय 19, रा. कासाणी, सध्या रा. जाधक उंबरी, ता. जावली) ही युवती बहिणीला आणण्यासाठी दुचाकीकरून अंधारी फाट्याकर गेली होती. तिला घेऊन घरी परतत असताना, अचानक चोरगे उंबरी गावच्या हद्दीतील मंदिरालगत तीन गवे रस्त्यावर आले. यातील एका गव्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीसह युवती खाली पडली.
दरम्यान, युवतीच्या हातासह पायाला दुखापत झाली असून, तिला पुढील उपचारासाठी कास पठार वन समितीच्या वाहनातून सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आता तिच्यावर साताऱ्यामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच, वन्यजीव बामणोली विभागाचे वनक्षेत्रपाल व्ही. डी. बाटे, मुनावळे वनपाल संदीप पवार यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली.
उपचारासंबंधी डॉक्टरांकडून माहिती घेत नातेकाइकांची भेट घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. वन विभागाने बादापुरे कुटुंबीयांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List