अभिनेत्रींना कपडे बदलताना पाहायचे अभिनेते, अभिनेत्रीच्या आरोपाने एकच खळबळ
हेमा समितीचा अहवाल जाहीर झाल्यानंतर दररोज एकएक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता नुकताच साऊथची अभिनेत्री राधिका सरथकुमार हिने देखील धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, मल्याळम फिल्म इंडस्ट्रीच्या शूटिंग सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरे लपलेले असतात. यामध्ये अभिनेत्रींचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते.
राधिकाने दावा केलाय की, तिने तिच्या फोनवर अभिनेत्रींचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील पाहिले आहेत. अभिनेत्रीने सेटवर घडलेल्या घटनेचा पर्दाफाश केला. मात्र, तिच्यासोबत असा प्रकार कुठे घडला याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. पण यानंतर अभिनेत्री खूप घाबरली होती. तिने यानंतर कधीही व्हॅनिटीमध्ये कपडे बदलले नाहीत.
राधिका ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती आता ६२ वर्षांची आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. अभिनेत्री म्हणाली की, “मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ पाहिले आहेत. ते पाहिल्यानंतर मला खूप राग आला. मी आग्रह केला की मला सुरक्षित राहण्याची खूप गरज आहे. मी व्हॅनिटी व्हॅनला नाही म्हणाले. हॉटेलमध्ये ही जबाबदारी महिलांवर आहे आणि त्यांना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल.
न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात सिनेसृष्टीत महिलांवर झालेल्या छळाचे धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. या अहवालामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गजांच्या नावापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. महिला कलाकार आता समोर येऊन त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाचे आरोप करत आहेत. यानंतर मल्याळम चित्रपट कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुपरस्टार मोहनलाल यांनीही पदाता राजीनामा दिला होता.
अभिनेते, निर्माते यांच्यावर आरोप
महिला कलाकारांनी समितीच्याच काही सदस्यांवर छळाचा आरोप केल्यानंतर मोहनलाला यांच्यासह इतर सदस्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर संपूर्ण कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली होती. 19 ऑगस्ट रोजी हेमा समितीचा अहवाल आल्यापासून अनेक महिला कलाकार पुढे येऊन त्यांच्यावर झालेल्या छळाबाबत माहिती देत आहेत. या महिला कलाकारांनी अभिनेते, निर्माते यांच्यावर आरोप केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List