Nagar News – सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा पाणी त्यागणार, कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका

Nagar News – सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा पाणी त्यागणार, कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका

नगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने मागील सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र झोपलेल्या सरकारला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत खालावली असल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सरकारला कोंडित पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, फायर सुविधा, लाईट, आरोग्यसेवा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

सातव्या वेतन आयोगाचा प्रश्नी तातडीने मार्गी लावावा यासाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भुमिका घेत सोमवारपासून शहरातील सर्व सुविधा बंद ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. काही उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावत चालली आहे. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सोमवार पर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर त्यानंतर अन्नासोबत पाण्याचा त्याग करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल यांनी यावेळी दिला.

महापालिकेसमोर सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशिनकर हे उपोषणाला बसले असून आज सहाव्या दिवशी त्यांची तब्येत खालावली आहे. जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशिनकर यांना उपोषण स्थळी सलाईन लावण्यात आली आहे. मात्र बाबासाहेब मुदगल यांनी सलाईन घेण्यास विरोध दर्शवला. उपोषणकर्ते बाबासाहेब राशिनकर यांचा बीपी वाढला आहे. त्याचबरोबर उपोषणकर्त्यांचे सुमारे 4 किलो वजन घटले असून शरिरातील साखरेचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;